अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाची सडक अर्जुनी तालुकाची बैठक सम्पन्न ; गोंदिया जिल्हा सडक अर्जुनी तालुका अध्यक्षपदी अभय वसंतरावं फुले सर यांची निवड

Spread the love


गोंदिया 30 मई वेबवार्ता..अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाच्या कार्याचा विस्तार करत संघटनेला तळागाळापर्यंत अधिक बळकटी देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले आहेत.
दि. 30 एप्रिल 2026 रोजी सडक अर्जुनी तालुका येथील संघटने च्या कार्यालया मध्ये आयोजित विशेष सोहळ्यात महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा भंडारा लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार मा. डॉ. खुशालचंद्र बोपचे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.
या सोहळ्यात सडक अर्जुनी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. अभय वसंतराव फुले सर यांची सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष म्हणून अधिकृत निवड करण्यात आली.
या वेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. गणेशभाऊ पारधी, गोंदिया जिल्हाध्यक्ष व्यासनारायण व्ही.टी. पटले सर, गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष दत्तराज जी गौतम, मा. श्री. भाऊदास जी जांभुळकर सर अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघ प्रवक्ता गोंदिया, तुलसीदास जी राऊत सडक अर्जुनी, सय्यद अहेमद जी, श्रीमती लोफा गजभिये, विद्या ताई फुले, देवांगना आर. फुले, अविनाश जी खोब्रागडे, कैलास जी भियटे, शिद्धार्थ उडीरवाडे तसेच बिसेन सर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या निवडीमुळे ओबीसी बहुजन समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजातील वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि महासंघाच्या ध्येयधोरणांना पुढे नेण्यासाठी हे नवीन नेतृत्व प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास डॉ. बोपचे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *